उमरेड (जि. नागपूर) : ६ डिसेंबर १९३३ या दिवशी उमरेड शहराने एक अनमोल रत्न गमावला तो म्हणजे नररत्न म. स. डेकाटे. ते लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यांच्या नेहमी संपर्कात असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते, एक संपादक, पत्रकार, छायाचित्रकार, मुद्रक, प्रकाशक अशा अनेक भूमिका पार पडणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. आज त्यांचा स्मृतिदिवस... पण अनेकांना त्यांच्याबद्दल माहितीच नाही. नररत्न डेकाटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी या लहानश्या गावी १८९२ साली झाला. ते मूळचे वर्धा जिल्ह्याचे होते, अशी माहिती जुनी जाणकार मंडळी देतात. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित डेकाटे सतत त्यांच्या संपर्कात असायचे. १८ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांनी लोकमान्य टिळकांची सभा उमरेड शहरात आयोजित केली होती. ती जागा आज टिळक चौक म्हणून प्रचलित आहे. देशाच्या शीर्षस्थ नेत्याला उमरेड सारख्या लहान गावात आणणेही महादेवरावांच्या संघटन कौशल्याची पावती म्हणावी लागेल. (व्हीडिओ : सतीश तुळसकर).
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.